... कधीतरी

Monday, February 28, 2005

पासवानसाहेब आता सगळी मदार तुमच्यावर !

गेल्या पंधरापेक्षा जास्त वर्षे बिहारवर राज्य करणार्‍या लालूच्या सत्तेला हादरा बसल्याने देशातल्या वा बिहारमधल्या राजकारणात किती फ़रक पडेल ते मला माहित नाही. पण त्यामुळे जर कुणाला सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तर तो माझ्या रूममेट्ला ...

खरे तर मी स्वतः राजकारणापासून चार हात लांबच राहायचे बघतो.. पण मी सुद्धा काल दिवसभर रेडिओला चिकटून होतो. याचे कारण म्हणजे माझे roommates ! कर्मधर्मसंयोगाने ( किंवा माझ्या नशीबाने म्हणा...) माझे दोन्ही roommates बिहारी आहेत !

रोज रात्री जेवण झाल्यानंतर रूममध्ये चर्चेचा एकमेव विषय असतो तो म्हणजे 'बिहारच्या सद्ध्याच्या स्थितीला लालू कसा कारणीभूत आहे ...'
पण दोघांचीही बिहारच्या भविष्याविषयी अगदी वेगळी मते आहेत.

राकेशच्या मते - "बिहारका कुछ नही हो सकता... " त्याच्या मते सगळे नेते चोर आहेत, आणि बिहारी जनतेविषयी कुणाला काही घेणे नाही. "अरे भाई हम बचपनसे ये सब देखा हुं ..." , तो समर्थन करतो. त्याच्या गावात अजून वीज नाही ! त्याने आपले शाळकरी जीवन कंदीलाच्या उजेडात अभ्यास करून पार पाडले आहे. अजूनही तो जेंव्हा घरी जातो, तेंव्हा त्याला जगाच्या २० वर्षे मागे गेल्यासारखे वाट्ते. लवकरात लवकर दिल्लीत सेट्ल होउन घरच्यानाही इथेच आणायचा त्याचा मानस आहे...

मिहीर मात्र आशावादी आहे. तो बिहारच्या आतापर्यंतच्या एकंदरीत प्रवासाकडे त्रयस्थ नजरेने पाहतो. त्याच्या मते आधी वैचारीक असलेला उच्च आणि मागासवर्गीयांमधला लढा नंतर रक्तरंजीत झाला. पण एकदा सगळ्यांच्या मनातील प्रक्षोभ बाहेर पड्ल्यानंतर आपोआप त्यांची पावले विकासाकडे वळतील... बिहारच्या जनतेने निवडणुकीत आता दिलेला कौल तो याचेच द्योतक मानतो...

अशी ही नवीन बिहारी पिढीची दोन भिन्न रूपे... एक निराशावादी तर दुसरा आशावादी ...
कोण जिंकणार ? काँग्रेस कि भाजपा ? लालू की पासवान ?... मिहीर की राकेश ???


पासवानसाहेब आता सगळी मदार तुमच्यावर !

Wednesday, February 23, 2005

मीही blog सुरु करतोय ...

"Information Technology" च्या नावाखाली रिकामटेकड्या बसलेल्या, भारतातील असंख्य ई-शिक्षीत लोकांपैकी मीही एक !

आधीच अमराठी प्रदेशात आल्याने मराठी भाषेशी तुटत चाललेलं नातं, आणि त्यात आलेला एकाकीपणा या दोन्ही गोष्टी माझ्या blog ला कारणीभूत आहेत ... वास्तविक पाहता blogpage वर लिहून जगाला सांगावं असं माझ्या आयुष्यात सध्या काहीही नवीन घडत नाहीये. पण तरीही फ़ुकाफ़ुकी server space मिळतीय ती का सोडावी असा विचार करून शेवटी मीही ब्लोग सुरु करतोय ...

पहिला वहिला blog !

"
वाचणारं कुणी असेल तर blog लिहीण्यात अर्थ आहे.
link skip करणार असतील, तर server space व्यर्थ आहे !

"


 
counters