... कधीतरी

Monday, March 07, 2005

पाणीपुरी

weekend चे आता तितकेसे अप्रूप राहिले नाही. नोकरीत नवीन असताना शुक्रवारची संध्याकाळ म्हणजे उत्साहाने शिगोशिग भरलेली असायची. पण आता मात्र 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे हा weekend सुद्धा नेहमीचा झालाय. पण तरीही एखाद्या वारकर्‍याच्या भाविकतेने आम्हा bachelers ची atta market ची शुक्रवारची वारी ठरलेली असते... तोच सबमॉल, तेच 'public' पहात याही weekend ला अट्टा मधून हिंडत होतो, तेवढ्यात शर्माजी भेटले. मुलाला भूक लागली म्हणून हॉटेलात चालले होते. "येणार काय पाणीपूरी खायला ?" मला त्यानी विचारले. आढेवेढे घेउन शेवटी मीही त्यांच्याबरोबर 'रामेश्वरम' मध्ये शिरलो.

तिथली पाणीपुरी हा एक 'अवर्णनीय' अनुभव होता. पाणीपुरीच्या काउंटरवर दोन माणसे टिपीकल शेफ़सारखी वेषभुशा (म्हणजे ऍप्रन, डोक्यावर टोपी वगैरे) करुन उभी होती. दोघांच्याही हातात प्लॅस्टीकचे ग्लोव्ह्स होते. पुरी चमच्याने फ़ोडायची, त्यात चमच्यानेच शेव-बटाटा वगैरे भरायचे इथपर्यंतची 'स्वछ्ता' ठिक होती, पण जेव्हा त्यात पाणी भरण्यासाठी त्याने ती पुरी एका पिंपाच्या तोटीखाली धरली तेव्हा मात्र मी हादरलो... "ही कसली पाणीपुरी ?"

आजुबाजुला पाहिले तर लहानलहान मुले मोठ्या मजेत पाणीपुरी फ़स्त करत होती आणि त्यांच्या फॅशनेबल आया 'इथली पाणीपुरी कशी 'हायजिनीक' आहे म्हणुन खुशीत होत्या. पण मला मात्र उगाचच चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले.

लहानपणी मित्रांबरोबर कधीतरी शाळेसमोरच्या गाड्यावरुन घेतलेला बर्फ़ाचा गोळा, शनिवारच्या दुपारी, 'अमरधाम'वर रणरणत्या उन्हात क्रिकेट खेळुन दमल्यानंतर कोपर्‍यात असलेल्या झाडाच्या पारावर बसून खाल्लेला 'पेप्सीकोला' , 'हरीपूर'च्या जत्रेला मित्रांबरोबर चालत जाताना वाटेत थांबुन पाड्लेल्या चिंचा... हे सगळं 'हायजिनीक' नसेलही, पण त्या त्या वेळी त्यात दडलेलं एक थ्रिल होतं, एक आनंद होता. सोफेस्टीकेटेड बनायच्या नादात हे लोक आयुष्यातल्या या छोट्याछोट्या आनंदाना मुकताहेत असं मला वाटु लागलं...

या मुलांच्या वाट्याला ते थ्रिल कधीच येणार नाही काय ? त्यांचं सोडा, पण मंडे टू फ़्रायडे ऑफ़िस आणि विकएण्ड म्हणजे अट्टा इतक्या सरावाच्या झालेल्या माझ्याही आयुष्यात पुन्हा ते आनंदाचे दिवस कधीच येणार नाहीत काय ?

1 Comments:

Post a Comment

<< Home


 
counters